गडचांदूर: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी ऐमर्स अकॅडमी गडचांदूर यांच्या वतीने दिनांक 5 ऑक्टोबर रोज रविवारला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. कल्याण जोगदंड सर (गट शिक्षणाधिकारी) मा. सचिनकुमार मालवी सर (विस्तार अधिकारी)यांची उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून मा. जानेश धोटे तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा.ऐजाज शेख, प्रा. नानेश्वर धोटे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण व दिपप्रज्वलन करून झाले.आपल्या मार्गदर्शनातून मा. कल्याण जोगदंड सर विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना “स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी नियोजन, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचा योग्य संगम असावा लागतो,” असे प्रतिपादन केले.
तर मा. सचिनकुमार मालवी सर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून  विविध स्पर्धा परीक्षा, त्यांची तयारी करण्याची पद्धत, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सराव प्रश्नपत्रिकांचे महत्त्व, नोंदी बनविण्याच्या पद्धती, शासकीय नोकऱ्यांमधील संधी याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे देऊन त्यांच्या शंका दूर केल्या.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवराद्वारे स्पर्धा परीक्षेतील विविध संधी व यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले आत्मपरीक्षण यांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जानेश धोटे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एजाज शेख यांनी केले. तर संचालन आपल्या मधुर वाणीने गौरी हनुमंते हिने व आभार प्रदर्शन झहीर शेख यांनी केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून स्पर्धा परीक्षेबद्दलची भीती दूर होण्यास मदत झाली.


