चिनोरा टी पाईन्ट येथे मनसे व स्थानिक ग्रामपंचायत माजी सरपंच सदस्यांनी पुकारला एल्गार.
वरोरा :- तालुक्यातील साई वर्धा पॉवर व जिएमआर कंपन्यानी स्थानिक परिसरातील गावांना दत्तक घेऊन सुद्धा त्या गावांचा पायाभूत विकास न मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण तयार करून जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरु केला, दरम्यान स्थानिक तरुणांना रोजगार पूर्णतः न देता या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक विटा उद्योजकांना फ्लाय हॅस दररोज मिळत नाहीं पर्यायाने हा उद्योग सुद्धा बंद होण्याच्या मार्गांवर असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्थानिक चिनोरा ग्रामपंचायत च्या माजी सरपंच सदस्यांनी वर्धा पॉवर व जिएमआर कंपन्याविरोधात एल्गार पुकारला असून दिनांक 20 फेब्रुवारी पासून चिनोरा टी पाईन्ट जवळ ठिय्या आंदोलन सुरु केले त्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून कंपनी प्रशासनाकडून कुठलीही चर्चा झाली नसल्याने हें आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे आंदोलनकर्त्याच्या प्रमुख मागण्या?
कंपन्यामधील परप्रांतीय कर्मचारी कामगारांना हाकलून स्थानिक मराठी भूमिपुत्र वेरोजगारांना नोकऱ्या द्या, प्रकल्प शेतक-यांच्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन कंपनी रोल वर नोक-या द्या. कंपन्यांच्या प्रदूषणामुळे शेतक-यांच्या शेतपिकांचे नुकसान होतं असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. चिनोरा गावातुन होणारी ओव्हरलोड वाहतूक व खुल्या ट्रक मधुन होणारी अंश वाहतुक बंद करून रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करा. कंपन्यानी दसक घेतलेल्या गावात सीएसआर फंडातून भरीव कार्य न करता ली फंड कुठे व कसा वापर केला याचा लेखाजोखा सार्वजनिक करा. चिनोण, सहेगाव, मोहवाळा, निमसा, डॉगण्णाव, चसरखती, बनोजा, मायदेव वा नाशलील महिला बचत गटांना आर्थिक सहकार्य करून त्यांच्यामार्फत लघु उद्योग उभारण्यास मदत करा. स्थानिक विट भट्टयांना व प्रकल्पग्रस्त वाहनधारकांना क्लाय अंश वाहतूकीकरिता प्रथम प्राधान्य देण्याल याये,
या आंदोलनाला मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, माजी सरपंच चिनोरा ताई परचाके, सुशीलाताई तेलमारे, सदस्य निलेश डोंगरकार, छायाताई कोल्हेकर, बाळू गेडाम, सौरभ झाडे, आशिष रोडे, पवन राम, गजानन भोयर, तुळशीदास धानोरकर, त्रिशूल निबूधे शरद भोयर यासह शेकडो गावकरी उपस्थित होते, यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, विजय तूरक्याल, राज वर्मा यांनी आंदोलनाला भेट दिली.




