चंद्रपूरः गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलींच्या सर्कल स्टाइल कबड्डी स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाने अजिंक्यपद पटकाविले आहे. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन सर्कल स्टाइल कबड्डी स्पर्धा विसापूर येथील राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.
या सर्कल स्टाइल कबड्डी स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. विजेते पद खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात आरती बारसागडे, अमीक्षा शेंडे, शालिनी निर्मलकर, खुशी कोंडागुर्ला, परिमिता भंडारकर, साक्षी टोंगे, आचल श्रीरामे, संचिता कातणकर, अंकिता बोरकुटे, करीना लोणबले, अप्शा शेख यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.
दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेडीवार कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंत डभारे, आदित्य मंगरूळकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले


