चंद्रपुरात 'मनसे'चा एल्गार! वाईन शॉपच्या स्थलांतरासाठी उद्या जनआक्रोश निदर्शने

Chandrapur Media 24

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील वाईन शॉप (दारू दुकान) स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता रस्त्यावर उतरणार आहे. जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वाखाली उद्या, गुरुवार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात भव्य आंदोलन छेडण्यात येणार आहे.

चंद्रपूर शहरातील वाढती दारूची दुकाने आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, मनसे प्रशासनाकडे आक्रमक मागणी करणार आहे. शहरातील विशिष्ट भागातील वाईन शॉपचे स्थलांतर तातडीने करावे, या मागणीसाठी उद्या सकाळी १०:३० वाजता वसंत भवन, गांधी चौक येथून आंदोलनाला सुरुवात होईल. हा मोर्चा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धडकणार आहे.


मनदीप रोडे यांचे आवाहन:
या संदर्भात बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे म्हणाले की, "हे आंदोलन केवळ राजकीय नसून जनहिताच्या प्रश्नावर आहे. दारूच्या दुकानांमुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. या आंदोलनात मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक महिला, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags