गोंडवाना विद्यापीठस्तरिय रग्बी स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय विजयी #chandrapur

Chandrapur Media 24



चंद्रपूरः : गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलींच्या रग्बी स्पर्धेत येथील सरदार पटेल महाविद्यालयाने अजिंक्यपद तर मुलांच्या संघाने रौप्य पदक पटकाविले आहे. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन रग्बी स्पर्धा बल्लारपूर येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.

या रग्बी स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. विजेतेपद खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात अमीक्षा शेंडे, आरती बारसागडे, परिमिता भंडारकर, ज्योति गोंड, अमीक्षा उइके, रमा यादव, शताब्दी कुंडू, पूजा थलाल, नोकीता साहू, वैष्णवी देशमुख, आचल श्रीरामे, खुशी कोंडागुर्ला आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले. तसेच मुलांच्या संघाने उपविजेतापद पटकाविले. उपविजेतेपद खेचून आणण्याकरिता मुलांच्या संघात शिवम तिवारी, सूरज भगाडे, गौरव धकाते, फरदीन खान, दीपक कडूकर, फैजान खान, शिवम धकाते, रोहित पवार, वेदांत विधाते, महेश भोगेकर, दर्शन मेश्राम, आदित्य मंगरुळकर यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.

दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेडीवार कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंत डभारे, आदित्य मंगरूळकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले
Tags