आमदार किशोर जोरगेवार यांची विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट

Chandrapur Media 24

  चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात सुरू असून या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत श्रींचे दर्शन घेतले. 

यावेळी अनेक गणेश मंडळांनी सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, डिजिटल इंडिया यांसारख्या विषयांवर साकारलेले देखावे पाहून आमदार किशोर जोरगेवार यांनी मंडळांचे कौतुक केले.
   आ. जोरगेवार यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक बदल घडविणारा उत्सव आहे.
 मंडळांनी घेतलेली ही सामाजिक जाण हीच खरी सध्याच्या काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.