मुख्य अभियंता यांना निवेदन सादर..#chandrapur

Chandrapur Media 24

सी.एस.टी.पी.एस व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचा वापर असलेला रिजेक्ट कोल गेट ते आवंठा डॅमकडे जाणाऱ्या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी
चंद्रपूर : निवेदनाचा उल्लेख आम्ही मागणी करणारे शेतकरी जवळजवळ ५२ शेतकरी नदीपासून विचोडा चौरस्त्यापर्यंत या रस्त्याचा वापर करतो तरी त्या रस्त्यावर जागोजागी खड्‌डे पडलेले आहे व आमच्या शेताचा बाजुला सी.एस.टी.पी.एस. चे इंजिनीयर श्री गेडाम साहेब यानी एक फुट डाया असलेला विस फुट लांबीचा लोखंडी पाईप नदीकडे जाणाऱ्या भागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असते त्याठिकाणी रफ्टयाची गरज आहे किंवा मोठे सिमेंट पाईप टाकावे लागते
 इतका मोठा पाण्याचा प्रवाह आहे अश्या ठिकाणी श्री गेडाम साहेब यांनी जे.सी.बी. ने खोदायी करून स्वतः उभ राहून लोखंडी पाईप टाकले व त्याठिकाणी कोणताही हार्ड स्टाटा किंवा (बोल्डर किंवा गिट्टी) न टाकता त्याठिकाणी थातूरमातूर माती भरून पाईप बुजविण्यात आले तरी त्यांनी गिट्टी बोल्डर न वापरल्यामुळे त्याठिकाणी गाड्‌या फसण चालू झाल्या व दोन दिवस रस्ता वापरण्यात नाही आले तरी आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांनी थातूरमातूर दोन-तिन ट्रॅक्टर माती आणून टाकली तरी आपणास नम्र विनंती आहे आपण या रस्त्यावर एकदा येवून अवश्य बघावे. रस्त्याची काय अवस्था आहे आपली कार जावू शकते का कमीत कमी आपण तपासावे आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी होणारे पाईपलाईनमुळे लिकेज व खोदलेल्या नालीमध्ये दोन गाई मरण पावलेल्या आहे तरी आपण कोणतेही नालीचे खोदकाम करत असतांना त्या रस्त्याया वापर शेतकरी गुरेडोरे करत असते याचापण विचार करावा व पंधरा दिवसाचा आत आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना डागडु‌गुजी करून रस्त्यामध्ये पाईप टाकून शेतकरांना दिलासा द्यावा. 

न दिल्यास शेतकऱ्यासमोर आंदोलनाशिवाय कोणताही मार्ग उरणार नाही आम्हाला त्या रस्त्याचा वापर दिवसरात्र करावा लागते. शेतामध्ये जागल करावे लागते तरी आपण आमच्या विनंतीला मान द्याल व पंधरा दिवसाचा आत याचावर उपाययोजना कराल न केल्यास आम्हाला सी.एस.टी.पी.एस मधून येणारा वाहतूक रस्ता बंद पाडावे लागेल व आपणास हा रस्ता करण्यास भाग पाडू व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत रस्ता चालू देणार नाही...