माजरी - पाटाळा क्षेत्रातील अतिवृष्टी व बुरशीजन्य करपा, यलो मोजाक रोगामुळे शेतपिकांचे नुकसान!

Chandrapur Media 24


*शेतकरी हतबल, नुकसान ग्रस्त परिसराची पाहणी करावी ( स्वप्नील वासेकर उपसरपंच )
भद्रावती तालुक्यातील शेतकरी सद्यस्थितीत आर्थिक संकटात सापडल्या चे दिसून येत आहे.अतिवृष्टी व बुरशीजन्य,करपा येल्लो मोझाक इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव शेतपिकावर वाढला असून काही परिसरात अतिवृष्टी मुळे पिके सडली आहेत, त्यामुळे बळीराजा हलबल झाला आहे. याबाबत पलसगाव येथील उपसरपंच स्वप्नील वासेकर व कृषी विषयक तंत्रज्ञ माहिती असणाऱ्या व अभ्यासू अनुभवी शेतकऱ्यांनी याविषयक माहिती देतांना तीन दिवसापूर्वी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सोयाबीन तसेच कपाशीच्या झाडाची पाने मोठ्या प्रमाणावर झडून या पिकांचे फुटवे तुटल्याने झाडांच्या फुल पाती गळून जाऊन झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे.मुसळधार पाण्यामुळे सखोल जागेवरील पीक वाहून गेली तर काही पीक आडवी झोपली आहेत.
नदी व नाल्या लागतच्या शेतात पाणी शिरून पिके सडून गेली आहेत,जिल्ह्यात भद्रावती तालुक्यात पावसाची सर्वात मोठी नोंद झाली असून या पावसामुळे शेतकऱ्याचे भविष्य उध्वस्त झाले आहे,ही पिके पावसामुळे प्रभावीत झाल्याने यावर्षी सोयाबीन कापूस या पिकांची उतारी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.भद्रावती तालुक्यातील शेतकरी आधीच आर्थिक खर्चाने खचून असून सतत्त च्या आप्पतीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.अश्या अवस्थेत शेतकऱ्यांना शासकीय दिलासा देणे गरजेचे आहे.यामुळे शासनाने त्वरित पावले उचलून प्रभावीत पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पळसगाव येथील उपसरपंच स्वप्नील वासेकर यांनी केली आहे.