ता. राजुरा- सविस्तर वृत्त असे की, राजुरा शहरामध्ये विशेषतः सत्ताधारी पक्षाचे आमदार तथा त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून विविध ठिकाणी विनापरवानगी चे अवैध होर्डिंग, बॅनर, फ्रेम, जाहिरात फलके इत्यादींचा अनधिकृत वापर होऊन शहराचे विद्रूपीकरण होत आहे. शहराच्या मुख्य मार्गावरील मोठ मोठे कट बॅनर्स सातत्याने लागत असल्याने यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताला आमंत्रण देण्याचे काम सुरू असून याकडे नगरपरिषद राजुराचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे एकंदर चित्र शहरामध्ये दिसून येत असून यामुळे सार्वजनिक जागेचा गैरवापर देखील होत असल्याचे चित्र सर्वत्र राजुरा शहरांमध्ये आढळून येत असल्यामुळे
जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये जय भवानी कामगार संघटनेचे श्री. रोहित बत्ताशंकर युवा शहर अध्यक्ष राजुरा व संघटनेच्या सदस्यांनी आज दि. ६/११/२०२५ ला राजुरा शहरातील अवैध होडिग, बॅनर फ्रेम इत्यादी काढण्याबाबत तथा शासन निर्दशानुसार कारवाई करण्या करिता आज संबंधित विभागांमध्ये, नगर परषद राजुरा येथे निवेदन देण्यात आले.
यावेळेस संघटनेचे उपस्थित पदाधिकारी तथा सहकारी श्री. रोहित बत्ताशंकर, राजु लड्डा, श्रावण साळवे, अतुल सिंग, साहिल कायडिंगे, चेतन मेश्राम, बालाजी चौधरी, ऋतुज जुलमे, आचल दुबे आधी उपस्थित होते.




