कोंढा-घोडपेठ :आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कोंढा-घोडपेठ क्षेत्रातून इंजि. जगदीश लवाडिया हे नाव सर्वाधिक चर्चेत असून, स्थानिक पातळीवर विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
इंजि. जगदीश लवाडिया हे शिक्षणाने सिव्हिल इंजिनीअर असून सध्या स्टेट इंजिनिअर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. गेल्या काही वर्षांत युवकांचे मार्गदर्शन, बेरोजगार अभियंत्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, गावोगावी जाऊन रस्ते, पाण्याच्या समस्या व शैक्षणिक अडचणी यावर सातत्याने काम करणे—यामुळे त्यांची ओळख विकासासाठी कटिबद्ध आणि जबाबदार नेतृत्व अशी निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या क्षेत्राला आज अशीच नेतृत्वाची गरज आहे—
✅ प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करणारे
✅ सर्व समाजघटकांना समान न्याय देणारे
✅ निधीची पारदर्शी अंमलबजावणी करणारे
✅ युवक, शेतकरी, महिला यांच्यासाठी ठोस योजना राबवणारे
इंजि. जगदीश लवाडिया यांनी प्रेसमार्फत सांगितले की,
“कोंढा-घोडपेठच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने काम करण्याचा माझा निर्धार आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, रोजगार, शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा आणि गावागावातील विकासकामे ही माझी प्राथमिकता असेल. नागरिकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे.”
स्थानिक पातळीवर व युवा वर्गामध्ये मोठी पसंती मिळत असल्याने, इंजि. जगदीश लवाडिया हे कोंढा-घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्रासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचे जनमत स्पष्ट होत आहे.


