कोरपना : गडचांदुर प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयामध्ये गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिन २ ऑक्टोबर रोजी असतो आणि या दिवशी भारतात महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधी, ज्यांना भारताचे राष्ट्रपिता मानले जाते, त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला होता, तर लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते.महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त, संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केले आहे, लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' ही घोषणा दिली आणि त्यांच्या प्रामाणिकपणा व कार्यक्षमतेमुळे ते नेहमीच स्मरणात राहतील. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ प्राथमिक शाळा गडचांदूर चे मुख्याध्यापक श्री आस्कर सर व सहशिक्षक वाघमारे सर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक आंबटकर सर यांनी भाूषवीले प्राध्यापिका कुबाळकर मॅडम सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि प्राध्यापक इजाज शेख सर यांनी मार्गदर्शन केले त्यातून त्यांनी देशाला गांधी विचारांची आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यशैलीची गरज आहे असे वक्तव्य केले
श्रुती लसनते व तन्वी चहाकाटे या विद्यार्थ्यांनी गांधी जयंती निमित्त भाषण केले व सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालान तन्वी खेवले ने केले व आभार साक्षी गुरनुले ने मानले
.


