चंद्रपुर : निवेदनातील उल्लेख, महोदया, 'सविनय विनंती या प्रमाणे आहे की, जागतिक स्तरावर ओळख असलेले तसेच आंबेडकरी जनतेचे धार्मीक, प्रेरणास्त्रोत असलेले ठिकाण दिक्षाभुमी व डॉ. बाबासाहेव आंबेडकर या वास्तुच्या परिसरालगत अनाधिकृत अतिक्रमनामुळे त्या ठिकाणची प्रतिष्ठा मलीन होत आहे. तसेच नागरिकांना अडथळा निर्माण होऊन वाहतुक कोंडी व अस्वच्छतेचे प्रमाण परिसरात वाढत आहे.. त्याच बरोबर दरवर्षीप्रमाणे दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ अशोका विजयादशमी व दिनांक १६ ऑक्टोंबर २०२५ धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमीत्त आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात इथे या वास्तुंचे अभिवादन करण्याकरीता येतात. करीता या अतिक्रमानामुळे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनतेला गैरसोयींना समोरे जावे लागत आहे.
अशा अतिक्रमनामुळे जागतिक पातळीवर दिक्षाभुमी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे महत्व कमी होत आहे. यामुळे आंबेडकरी जनता दुखावली आहे.
तरी आपणांस नम्र विनंती आहे. की चंद्रपूर दिक्षाभुमी समोरील उडाणपुलाखालील अतिक्रमण हटवुन तिथे स्वच्छता करावी. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरालगत अतिक्रमण हटवुन तिथे स्वच्छता करावी. या अतिक्रमनावर तात्काळ लक्ष देवून या समस्येचे नियमानुसार कार्यवाही करून निराकरण करावे. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दखल घेण्यात यावी हि विनंती...

