अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी नगर द्वारे दिनांक 17/09/2025 ला मा. तहसीलदार शुभम बाहकर यांना  गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेस ची समस्या व रस्त्यातील खड्यची समस्या बाबत चे निवेदन देण्यात आले होते.आणि मा . तहसीलदार यांनी तात्काळ संबंधित सर्व विभागाला विषयावर पालन करण्याच्या सुचना दिल्या .
आणि प्रशासन विभागाने त्यांचे पालन केले.त्या संदर्भात आज दिनांक 24/09/2025 ला मा. तहसीलदार महोदय कडून बैठक घेण्यात आली असून येत्या दोन दिवसांत बस सेवा सुरू व  रस्ते दुरुस्ती करण्याचे असल्याचे आदेश तहसीलदार यांचा कडून देण्यात आले  बैठकीला संबधित विभागातील अधिकारी सहभागी होत 
अहेरी आगार प्रमुख जितेंद्र राजवैद्य, वाहतूक नियंत्रक एस. बी काठवणे जिल्हा परिषदेचे सहायक अभियंता संदीप गरफल व विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटन मंत्री सुजान चौधरी, गोंडपिपरी नगर मंत्री अनिकेत कलगट्टीवार, आदर्श मास्टे व जिल्हा केंद्राचे कार्यकर्ते उपस्थित होते .

