कोरपना :-- गडचांदुर..महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले "महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४" हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे..? या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे..! हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही..? त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता "महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४"  तत्काळ रद्द करण्यात यावे या मागणीला घेऊन शिवाजी चौक गडचांदूर येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार), शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तथा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध तथा धरणे आंदोलन करण्यात आले...! 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण निमजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयराव बावणे, तालुका अध्यक्ष उत्तम पेचे, शिवसेना तालुका प्रमुख सागर ठाकूरवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष महाडोळे, महिला शहर अध्यक्ष किरण एकरे, महिला तालुका अध्यक्ष आशा खासरे, न. प. माजी उपाध्यक्ष सचिन भोयर, शैलेश लोखंडे, अभय मुनोत, सुनील झाडे, संजय एकरे, प्रदीप गुडडेलीवार, राहुल उमरे, भाऊराव चव्हाण, धनंजय गोरे, राहुल मालेकर, मयूर एकरे, युवक काँग्रेसचे महादेव हेपट, विवेक येरणे, अक्षय गोरे, अहमद शेख, अनिल गोंडे, रितेश ताडे, हारून सिद्दिकी, आकाश वराटे, आशिष वांढरे, पुरुषोत्तम मेश्राम, देविदास मुन, प्रणित निवलकर, इंदर कश्यप, शरीफाबाई,कोवन कातकर, प्रणय पानघाटे, सूरज गोंडे,यांचेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते..

