*विद्यार्थ्यांनी फेरी काढून समाजाला दिला नशामुक्तीचा संदेश*
भद्रावती :- लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती आणि भद्रावती पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच नशामुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. उल्हासजी भास्करवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मोहनजी धोंगळे व पोलीस उपनिरीक्षक सौ. प्रियांका गेडाम यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याचा संदेश दिला.
प्रास्ताविक प्राचार्य श्री. रूपचंद धारणे यांनी केले. लोकसेवा मंडळाचे पदाधिकारी अविनाशजी पानपट्टीवार, गोपालजी ठेंगणे, अमितजी गुंडावार, संजयजी पारधे, उमाकांतजी गुंडावार यांच्यासह उपप्राचार्य श्री. वटे, पर्यवेक्षक श्री. सुरावार, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. संचालन प्रा. अकोजवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. नितीन लांजेवार यांनी मानले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची भव्य फेरी काढण्यात आली. घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी “नशा मुक्त भारत”चे नारे दिले. या फेरीमध्ये सर्व शिक्षक, प्राचार्य, लोकसेवा मंडळाचे पदाधिकारी व भद्रावती पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

