सेबी स्मार्ट, शेअर मार्केट विशेषज्ञ माननीय श्री राहुल खरवडे यांच्याद्वारे शेअर मार्केट वरील मार्गदर्शन सोहळा गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न.....

Chandrapur Media 24


सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, येथील अर्थशास्त्र विभागा तर्फे पी.एम. उषा स्कीम अंतर्गत जी. एस. सी. RUSA याद्वारे तज्ज्ञांचे विचार, ज्ञान आणि माहिती विद्यार्थ्यांना मिळावी,याकरिता “Certificate course on Importance and Participation Share Market ”, या विषयावर आयोजन करण्यात आले.
 आर्थिक नियोजन, प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार, गुंतवणुकीचे महत्त्व, म्युच्युअल फंड आणि सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करताना घ्यावयाची खबरदारी इ. विषयावर विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन अत्यंत शैलीबद्ध तसेच वेळेचे काटेकोरपणे नियोजन करून अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली नंदुरकर मॅडम आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. तुषार आवळे सर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. प्रेक्षणा बागेसर, प्रा.आकाश वाळके तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.