*नागरिकांसाठी निःशुल्क वैद्यकीय शिबिराचे आयोजन*
भद्रावती :- भद्रावती तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी स्थापन झालेल्या जनप्रिय समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थाचा भव्य शुभारंभ सोहळा रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता नेताजी कॉलनी, भद्रावती येथे संपन्न होणार आहे.
      या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहीर राहणार असून, उद्घाटन वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. करण देवतळे यांच्या हस्ते होणार आहे.
तर प्रमुख उपस्थितीत चिमूर क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवर,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मा. रविंद्र शिंदे , ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीष शर्मा, वरोरा विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश राजुरकर, तसेच आदी मान्यवरांचा समावेश आहे.
       संस्थेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी निःशुल्क वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणीसह विविध उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.
    संस्थेचे अध्यक्ष गोपाल मंडल, उपाध्यक्ष ठाकुरपद राय, सचिव डॉ. आर. बी. बाला, कोषाध्यक्ष पवित्र मंडल, सहसचिव नारायण डाकूआ, तसेच कार्यकारिणी सदस्य कुमुद बिश्वास, सुभाष मिस्त्री, जयदेव सरकार, निर्मलचंद्र सरकार, संजीव बैरांगी आदी पदाधिकारी व सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
    स्थानिक नागरिकांमध्ये या भव्य कार्यक्रमाबाबत उत्सुकता असून, संस्थेच्या पुढाकारातून समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

