सरदार पटेल महाविद्यालयाचे आयोजन...तिरंगा ध्वज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chandrapur Media 24

चंद्रपूर- ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत येथील सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाद्वारे आयोजीत करण्यात आलेल्या ‘तिरंगा ध्वज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक या रॅलीत सहभागी झाले होते.

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत १४ अगस्त रोजी महाविद्यालयाच्या इमारतीवर   
इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रकाश शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर "हर घर तिरंगा" अभियान अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. राजकुमार बिरादार, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बन्सोड, एनसीसी मुली प्रमुख प्रा. कांचन रामटेके तसेच प्राध्यापकवृंद, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.