तब्बल २४ वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर विखुरलेले सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र...! #Chandrapur

Chandrapur Media 24


कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी येथे दहाव्या वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा अर्थातच माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन व शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात तसेच खेळी मेळीच्या वातावरणात पार पडला. तब्बल २४ वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर विखुरलेले सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने एकमेकांना पाहून सर्वजण आनंदाने भारावून गेले. Scattered alumni reunite after 24


यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ प्रकाश महाकाळकर गटशिक्षण अधिकारी भद्रावती, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पा कोटेवार मुख्याध्यापिका जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी, प्रमुख मार्गदर्शक अतिथी किशन गुरुनुले, रमेश रामटेके, ज्योतिराम गावंडे, देवानंद दुर्गे सुनील डोंगे, प्रभाकर सावे, कैलास मेश्राम आदी उपस्थित होते.
डॉ. महाकाळकर यांनी जुन्या आठवणीला उजाळा देत गेट टुगेदर स्नेहबंधाना घट्ट व गोड आठवणीच्या गाठी बांधणारा सुंदर सोहळा म्हणत दहावीची कविता ‘आई एक नाव असतं’ सूर लावून गायल्याने सर्व माझी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.


ते म्हणतात ना ‘एक एक कडी गुंतली की त्याची साखळी तयार होते’ अगदी तशीच एक साखळी या सर्व विद्यार्थ्यांनी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून तयार करून स्नेहभेट घडवून आणायची संधी मिळाली ती दिवाळी सणामुळे या भेटीला आठवणींचा ओलावा मिळावा यासाठी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेतच हा स्नेहमेळावा सोहळा पार पडला.


यावेळी तब्बल ६० जणांनी आपल्या बालपणीच्या आठवणी त्याच वर्ग खोलीत जागवल्या, जेथून सर्वजण दुरावले होते. तिथेच पुन्हा भेटून आठवणी जाग्या केल्या. अनेकांनी तर आपल्या मुला-मुलींना सोबत आणले होते. आणि ते चिमुकलेही या विद्यार्थ्यांचा सोहळा पाहून भारावून गेले.
सर्वप्रथम जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले. शाळेसाठी जागा दान देणारे बनराव मत्ते यांच्या पत्नी शेवंताबाई मत्ते, दहावीमध्ये चांगले गुण मिळविलेले विद्यार्थी, सर्व माजी विद्यार्थी तसेच गुरुजन मंडळीना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थांनी शाळेला आठवणीतील भेट म्हणून पोडियम डायस देण्यात आला.

पुढे किशन गुरुनुले यांनी सांगितले की मी शेतकरी आहे असे सांगायला घाबरू नका तो केवळ व्यवसाय नसून संस्कृतीचा पाया आहे तुम्ही शेतकरी म्हणून तुमच्या कामाचा अभिमान बाळगा आणि शेतीत नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधा.
अध्यक्षीय भाषणात पुष्पा कोटेवार म्हणाल्या की माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शाळेची प्रगती कशी साधता येईल याबाबत आपण सर्व मिळून प्रयत्न करूया असे सांगितले


शाळेतील किस्से, कहाण्यांना उजाळा दिला. दिवसभर गप्पागोष्टी, एकमेकांच्या हितगुजात रमल्यानंतर सोबतच भोजनाचाही आस्वाद घेण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट गोड केला. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा मानसही व्यक्त करत जड मनाने एकमेकांना निरोप दिला.
कार्यक्रमाचे संचालन चिनू निरंजने प्रस्ताविक उमेश राजुरकर तर आभार उज्वला मांढरे यांनी मानलें



कार्यक्रमाचे आयोजक :
बबन पेंदोर, देवेंद्र ढवस, रत्नाकर पिदुरकर, अमोल निरंजने, स्वप्नील धोटे, दिवाकर सावे, अनिल पिंपळशेंडे, देविदास बांदुरकर व सर्व माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. यावेळी सर्व माजी विद्यार्थी व त्यांचा सहपरिवार सोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags