शाळांमध्ये सीसीटीव्ही, पोलिस गस्त वाढविण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी
डोंगराळे प्रकरणानंतर सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजनांची मागणी
भद्रावती : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या घटनेच्या गंभीरतेची दखल घेऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन प्रषित करण्यात आले.
यावेळी घटनेचा जलदगती (Fast Track Court) मार्फत तपास व्हावा, आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शाळांची नियमित तपासणी करावी, असेही निवेदनात नमूद आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा सुट्टीच्या वेळेस पोलिस गस्त व शहरात फिरस्ती व्हॅन कायम ठेवावी, अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली.
निवेदन देताना प्रखंडमंत्री, विश्व हिंदू परिषद,भद्रावती,अर्जुन लांजेकर, हनुमानजी घोटेकर, सूरज पेदाम, विशाल दाते, पृथ्वी चव्हाण, सौरभ घोटेकर, ऋषी वरकडे, तरुण मिश्रा, अनुज आगलावे, शाम वैद्य उपस्थित होते.
या घटनेला न्याय मिळावा, दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक बळकट व्हावी, यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषदेने सांगितले.


