चंद्रपूर. बोर्डा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या कामकाजात गेल्या काही वर्षांपासून अनियमितता दिसून येत आहे. शाळेतील गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करत असल्याने चंद्रपूर न्यायालयाच्या आवारात शाळेच्या पुरुष अधीक्षक आणि त्यांच्या पत्नीने भ्याड हल्ला केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते राहुल कुकडपवार यांनी पत्रकार परिषदेत पुरुष अधीक्षकांवर आणि त्यांच्या पत्नीवर कारवाई करण्याची आणि अधिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
कुकडपवार ने सांगितले की, बोर्डा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील पुरुष अधीक्षक धनेश पोटदुखे यांनी ४ डिसेंबर २०१८ ते 3१ मे २०२५ पर्यंत ७ वर्षे 3 महिने सेवा बजावली. सामाजिक कार्यकर्ते राहुल कुकडपवार यांनी आश्रम शाळेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की, एक कर्मचारी इतकी वर्षे सरकारी पदावर कसा राहू शकतो. दरम्यान, आश्रम शाळेतील अनेक कामांमध्ये कंत्राटदाराशी संगनमत करून अनियमितता आढळून आली आहे. याची तक्रार वरिष्ठांकडे केल्याने आर्थिक अनियमितता उघडकीस येईल या भीतीने, अधीक्षक पोटदुखे यांनी त्यांच्या पत्नीसह २3 सप्टेंबर रोजी चंद्रपूर न्यायालय आवारात खोटे आरोप लावत भ्याड हल्ला केला, ज्यामुळे ते जखमी झाले
असा आरोप राहुल कुकडपवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. चंद्रपूर रामनगर पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात, बोर्डा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील वरिष्ठांनी शाळेत आढळलेल्या अनियमिततेची चौकशी, अधीक्षक पोटदुखे यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी कुकडपवार यांनी पत्रपरीषदेत केली आहे. पत्रकार परिषदेत राहुल कुकडपवार आणि अयुब कच्छी उपस्थित होते.
----------------------------


