शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचा स्थापना दिवस तसेच गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहोळा उत्साहात साजरा

Chandrapur Media 24
दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचा स्थापना दिवस दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल साजरा करण्यात आला. चंद्रपुरातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ख्याती असलेले स्व. छोटूभाई पटेल यांची जयंती व याच दिवशी दि. १३ सप्टेंबर १९९७ रोजी विधी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली तेव्हापासून हा दिवस स्व. श्री. छोटूभाई पटेल यांची जयंती आणि विधी महाविद्यालयाचा वर्धापण दिन म्हणून साजरा केला जातो.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाचे कार्यकारी सदस्य तसेच श्री. छोटूभाई पटेल यांचे नात् श्री. जिनेश पटेल, सचिव श्री. प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तिवर्धन दीक्षित, कोषध्यक्ष श्री. संदीप गडमवार, श्री निकुंज पटेल, श्री. अतूल पटेल यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले व स्थापना दिवस साजरा करण्यामागची भूमिका विषद केली. डॉ. किर्तिवर्धन दीक्षित यांनी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या स्थापनेत श्री. छोटूभाई पटेल यांच योगदान अतुलनीय असून त्यांच्यासारखे दातृत्व गुण असलेली व्यक्ती आज दुर्मिळ असल्याचे मत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविद सावकार पोरेड्डीवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. छोटूभाई पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. मध्यवर्ती भारतातील एक सुप्रसिद्ध विधी महाविद्यालय म्हणून शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाची ओळख आहे आणि तो निर्माण करण्यात अनेक लोकांचे योगदान असून स्व. छोटूभाई पटेल हे नाव त्यातील अग्रस्थानी असल्याचे श्री. पोरेड्डीवार यांनी सांगितले, या दिनाचे औचित्य साधून विधी महाविद्यालयातील प्रविण्य प्राप्त विध्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. या वर्षी सत्र २०२२-२३ व २०२३-२४ च्या गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या विद्याथ्यांचा सुवर्ण पदक प्रदान करून गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने स्व. रमाबाई चपळगावकर सुवर्ण पदक कु. ऋतुजा सातपुते व कु. ईशा तनेजा या विध्यार्थीनीला देण्यात आले. स्व. दादाजी देवईकर व श्रीमती जानकीताई देवईकर सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले श्री. कैवल्य देवपूजारी व श्री. आकाश गिरी यांना प्रदान करण्यात आले. ऍड. एस. वाय. शिरपूरकर व श्रीमती सुनंदा शिरपूरकर स्मृती सुवर्ण पदक Jurisprudence या विषयात श्री. कैवल्य देवपुजारी आणि कु, तनया सालकडे यांना प्रदान करण्यात आले तसेच Interpretation of Statute या विषयांचे सुवर्ण पदक श्री. कैवल्य देवपूजारी आणि कु. ईशा तनेजा या विद्यार्थ्यांना देण्यात आले. स्व. डी. एम. मुन्शी स्मृती सुवर्ण पदक जे पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील प्रावीन्य प्राप्त विध्यार्थीला देण्यात येते ते श्री. अनिल श्रृंगारे यांना प्रदान करण्यात आले. आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापक डॉ. नंदिता नायर व डॉ. रेणू काटकर यांचा स्मृती चिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील प्रावीण्य प्राप्त विध्यार्थी श्री. ऋषिकेश मंडपे व कु. ईशा तनेजा या विद्यार्थीनीला स्व. छोटूभाई पटेल व लताबेन पटेल ५०००/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवारांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. पूर्णदू कार, डॉ. पंकज काकडे, डॉ. मार्गवी डोंगरे, डॉ. सरोज कुमार दत्ता. डॉ. अभय बुटले, प्रा. संजय तरवटकर व प्रा. सुबोध मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. मनीषा आवळे यांनी व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. लिना लंगडे यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, डॉ. जयेश चक्रवर्ती, डॉ. ठाकुरवार, डॉ सोमकुवर यांच्यासह विधी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. अंजली हस्तक, ऍड. अजित लाभे, सर्व प्रविण्य प्राप्त विध्यार्थी यांचे पालक, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.