भद्रावती ( ता . प्र क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी
कार्यालय व्दारा आयोजित तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्थानिक श्री साई कॉन्व्हेंट च्या
तीन खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
येथील यशवंतराव शिंदे इंडोअर हॉल येथे नुकत्याच झालेल्या तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षों आतील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत वर्ग ७ ची खेळाडू कु . शाश्वती बडकेलवार,वर्ग ८ ची खेळाडू कु. अवनी गोवधर्न तर १४
वर्षा आतील मुलांच्या संघात सिध्दार्थ गोवर्धन या खेळां डुची निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली.या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका कु.किरण कोथळे
क्रिडा शिक्षक सुनील दैदावार
सुब्रोत्तम मिस्त्री, देवानंद जुमडे, प्रथम पतरंगे, वर्ग शिक्षीका यांना दिले. या सर्व खेळांडूचे अभिनंदन संस्थेचे सचिव अतुल गुंडावार, कांता ताई गुंडावार, रूपा गुंडावार यांनी केले. तसेच पुढील खेळाकरिता शुभेच्छा दिल्या.

