*बॅडमिंटन स्पर्धेत लोकमान्य विद्यालयाचे खेळाडू जिल्हास्तरावर*

Chandrapur Media 24
भद्रावती (तालुका) शालेय तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा यशवंतराव शिंदे बॅडमिंटन हॉल येथे दिनांक 28 ऑगस्ट 2025 ला पार पडल्या या स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्याल येथील 19 वर्षाखालील खेळाडूंनी तालुकास्तरावर दमदार कामगिरी करत विजयी मिळवून जिल्हा स्तरावर पोहोचले आहे.
  19 वर्षाखालील या बॅडमिंटन विजय खेळाडूमध्ये अर्चना साह, सृष्टी पोटे, नुपूर दातारकर, क्षितिजा पराते, साहिल खंडाळकर ,अर्चना निब्रड, ओम लोथे,वैभव ससाने, सृजल मून चा समावेश आहे. यानंतर चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत लोकमान्य विद्यालयाचा हा संघ भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करणार आहे. 
  विजयी संघातील खेळाडूंचे प्राचार्य रूपचंद धारणे, उपप्राचार्य प्रफुल वटे पर्यवेक्षक आशुतोष सुरावर, विशाल गावंडे, मार्गदर्शिक कु.प्रणिता शेंडे, विजय गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले.