चंद्रपूर..शहरात जोरजबरदस्तीने सुरु असलेले स्मार्ट मीटर लावण्याचे काम तातडीने थांबविण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. अनेक नागरिकांना नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिल हे कुठे दुप्पट तर कुठे तीनपट वाढले असून गरीब जनतेची सरळसरळ लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांच्या तक्रारींनुसार, बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरची सखोल चौकशी व ऑडिट करून वाढीव बिल कमी करण्यात यावे, तसेच चौकशी अहवाल येईपर्यंत नवीन मीटर बसविण्याचे काम थांबवावे, अशी विनंती आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी बाबूपेठ येथे तिरंगा यात्रेत आलेले पालकमंत्री अशोक उईके यांच्याकडे केली.
या प्रसंगी आम आदमी पार्टीचे जयदेव देवगडे, मनीष राऊत, तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

