श्री नवयुवक बाल गणेश मंडळ दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर मागील सन 2020 पासून सलग 5 वर्षे प्रथम पुरस्कार प्राप्त करणारे गणेश मंडळ म्हणून नावलौकिक प्राप्त केले आहे. तसेच पर्यावरणपूरक जनजागृती पर देखावा तयार करून पर्यावरण पूरक गणेश मंडळ म्हणून एक आगळी वेगळी ओळख चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण केली आहे.
यावर्षी सुद्धा मंडळाने नदी प्रदूषण वर जनजागृती पर देखावा साकारला आहे. ज्यामध्ये आपण नदीला माता मानतो आणि नदीमध्ये कचरा, निर्मल्य, सांडपाणी सोडतो व आपल्या मातेला अस्वच्छ करतो असा भावनिक संदेश नदीच्या रुपात श्री गणेश भगवान आपल्याला देत आहे. या मंडळातर्फे यावर्षी सहा फूट रुंद व बारा फूट लांब नदी साकारून त्या नदीला बाप्पाचे रूप देण्यात आले आहे व भारतातील नदी प्रदूषणाची अवस्था व त्यामुळे मृत्तप्राय होत चाललेल्या नद्या यावर देखाव्यामध्ये जनजागृती करून भाविकांच्या भावनेला जागृत करण्याच्या प्रयत्न यावेळी मंडळाने केला आहे.
त्यासोबतच भाविकांना 120 फूट गुफेमध्ये जैवविविधता, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, मोबाईलचे परिणाम असे विविध सामाजिक देखावे व त्यासोबतच भारतीय सैन्याची शौर्यगाथा असा देखावा सुद्धा पाहायला मिळणार आहे.
मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबित असतो यावर्षी सुद्धा मंडळाद्वारे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, विज्ञान प्रदर्शनी, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, लेझीम पथकाद्वारे बाप्पाची स्थापना, देशीखेळ असे अनेक उपक्रम घेण्यात येणार आहे.अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे अशी माहीत आय ट्रान्सप्लांट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सपन दास यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

