*३२ वर्षांनंतर वर्गमित्रांचे स्नेह मिलन सोहळा**आठवणींच्या सहवासाने डोळे पाणावले*

Chandrapur Media 24

भद्रावती :- लोकमान्य विद्यालय तथा महाविद्यालय, भद्रावतीच्या दहावी १९९३ च्या विद्यार्थ्यांचे ३२ वर्षांनंतरचे स्नेह मिलन १७ ऑगस्ट २०२५ रोजी मुरलीधर पाटील गुंडावार लॉन येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडले. पुणे, मुंबई, हैदराबाद, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व भद्रावती येथील तब्बल ११० विद्यार्थी मित्र-मैत्रिणी व १२ शिक्षक-शिक्षिका या संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार ठरले.
       शाळेपर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पंजाबी ढोल-ताशांच्या गजरात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेत प्रार्थना व वर्गात बसून पांढरे सर व पामपट्टीवार सर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी पुन्हा तो जुना काळ अनुभवला.
        यानंतर गुंडावार लॉन येथे शिक्षकांचा सन्मान सोहळा रंगला. प्राचार्य मा. धरणे सरांसह पांढरे सर, जांभुळे सर, दरेकर सर, पामपट्टीवार सर, रावळे सर, मुनेश्वर सर, महाकुलकर सर, पाटील सर, ठेंगणे सर, पबितवार मॅडम व सोनटक्के मॅडम यांचा मान्यवर सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्र प्रकाश खडकेकर (सागर रांगोळीकार) यांनी रांगोळी स्वरूप सेवा देत सर्वांची मने जिंकली.
       शाळेबाहेर गोळ्या-बिस्कीट विकणारे नत्थू भाऊ होकम यांना सुद्धा सन्मानपूर्वक निमंत्रित करून गौरविण्यात आले. त्यांच्या आठवणींना जपण्यासाठी छोटेखानी दुकान ठेला उभारण्यात आला व त्या काळातील खाद्यपदार्थ सर्वांनी आस्वादाने चाखले.

       कार्यक्रमादरम्यान दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मैत्रीचा केक कापून एकात्मतेचे प्रतीक जपण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा परिचय सत्र, नृत्य-गायनाचे रंगतदार सादरीकरण, आणि संस्मरणीय ग्रुप फोटो फ्रेमसह वाटप या उपक्रमांनी सोहळा संस्मरणीय ठरला. जुन्या आठवणींना उजाळा, मैत्रीचे नवे बंध आणि भावनिक क्षण यामुळे हा सोहळा सर्वांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला.
      अनेक माजी विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत असून, भविष्यात परस्पर सहकार्य व मार्गदर्शन देण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

कार्यक्रमाचे संचालन मोनाली कुलकर्णी (जानकी भांदककर) यांनी केले. प्रास्ताविक रितेश उपलंचीवार, तर आभार प्रदर्शनही त्यांच्याच हस्ते झाले. संपूर्ण यशस्वीतेसाठी रितेश उपलंचीवार, नरेश लांडगे, कालिदास कोलते, विनोद ठमके, अब्दुल मतीन, राजेश गुंडावार, नितीन मशीदकर, संजय राय, नंदू नक्षिने, मनोज खरवडे, मनीष गोलेच्छा, महादेव टोंगे, प्रताप हांडे, भुजंग पोटे, समीर देशमुख, प्रवीण झाडे, उदय गुंडावार, दिनेश श्रीकुंटवार, अर्चना झाडे, संगीता सातपुते, रंजना लांडगे, कविता तीतरे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.