गडचांदूर : कामगार बबन आत्राम यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील एक आठवड्या पासून फरार आरोपीं सागर ( मारखंडी ) बल्कि , ईश्वर गाडगे व नितेश लांडे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला असला, तरी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गडचांदूर येथील चौकशी अधिकारी यांचे अधिनस्त सहकर्मी पोलिसांवरील भ्रष्टाचाराचे आरोपांमुळे संताप व्यक्त केल्या जात आहे. दिनांक २७ फरवरी रोजी आरोपी ना पोलीस कस्डतीत घेण्याचे आदेश गड़चांदुर पोलीस स्टेशन ला दिल्या बाबत एसडीपीओ चे रायटर सचिन पड़वे यांनी बबन आत्राम यांना एसडीपीओ ऑफिस मध्ये सांगितले..?
तरी देखील गडचांदुर पोलिसांनी आरोपिना ताब्यात घेतले नाही उलट त्यांना 5 मार्च रोजी भूमिगत होण्याचा सल्ला देण्यात आला..?
५ मार्चला आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर असतानाही त्यांना अटक का केली नाही..?
जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. गुप्ता यांनी तिन्ही आरोपींना ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाने कडक अटी घातल्या असून आरोपींना पुढील एक महिना दर सोमवारी सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान गडचांदूर पोलीस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक केले आहे
न्यायालयाने जामीन दिला असला, तरी पीडित बबन नारायण आत्राम यांनी न्यायालयीन लढ़ा पूर्ण ताकदिने लढ़न्याचा निर्णय घेतला असून
पीडित बबन आत्राम यांनी पोलिसांवर आरोप करत सांगितले की आरोपिना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल करणार,हे प्रकरण येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या प्रशासनात मोठे वादळ करणार की काय असे चित्र दिसत आहे..!


