सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक साप्ताहिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या साप्ताहिक कार्यक्रमाची सुरुवात 8 एप्रिल 2026 रोजी उद्देशिका वाचनाने करण्यात आली. याच दिवशी जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वॉकथॉन पदयात्रा काढून आरोग्याबाबत जनजागृती केली.
दि. 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी समाजसुधारणेतील त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
दि. 13 एप्रिल 2026 रोजी सामाजिक समता या विषयावर श्री शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्रा. विश्वास शंभरकर यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
दि. 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या त्याच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून सामाजिक समता साप्ताहिक सोहळ्याचा समारोप करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.
हा संपूर्ण उपक्रम महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खणके आणि डॉ. राजकुमार बिरादार यांची उपस्थिती लाभली.
या साप्ताहिक सोहळ्यात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, आरोग्याचे महत्त्व आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांची प्रेरणा निर्माण झाली.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबाबत शुभेच्छा दिल्या.


