चंद्रपुर : इतिहास साक्ष आहे स्वराज्य उभारुन रयतेच्या मनातील गुलामी व अंधकार दूर करून प्रकाशमय स्वातंत्र उभे करणारे एकमेव विश्व-वंदनीय राजे म्हणजे श्रीमंतयोगी शिवछत्रपती शिवाजी महाराज
दिवाळीचा पहिला दिवा स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज..
 यांना स्मरण करून दिवाळी निमित्त चंद्रपुर येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थिंक चंद्रपुर ग्रुप व मित्र परिवार तर्फे दिवाळीची सुरुवात दिप-उत्सव करून करण्यात आली. यावेळी सातशे पेक्षा अधिक दिवे लावण्यात आले व सोबतच महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले..
 व मिठाई वाटप करण्यात आली यावेळी प्रामुख्याने अँडवोकेट आशीषजी मुंधडा व थिंक चंद्रपुर ग्रुपचे सदस्य शुभम निंबाळकर आकाश वानखेडे शंकर वांढरे राहुल किरमोरे सुमित पेटकुले रुपेश चहारे साक्षी गोलजवार श्रेया पवार सविता वांढरे वैभवी गेडाम लकी मिश्रा आंचल चांदेकर श्रुती अलगुंवार स्नेहा किन्नाके श्रद्धा केलझकर गुंजन बंडीवार मनस्वी पंदिले अक्षय किरमोरे ओम अरवेल्लीवार प्रतीक निंबाळकर आशीष पंदिले आशय वानखेडे कुणाल निंबाळकर मनु निंबाळकर निहांश कथलकर वैभव उमाटे भरत घाटे वैभव कुलटे कृष्णा घाटे उपस्थित होते. मागील दहा वर्षापासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.




