-तर यश तुमच्या दारात- प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर
चंद्रपूर- अपयशाने खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने कामाला लागा. आयुष्यात खूप साऱ्या संधी येत असतात, त्या संधीचे सोने करा. तुमच्यात दडलेले नेतृत्व गुण, कौशल्याच्या बळावर वक्तृत्व शैलीने स्वतःला सिद्ध करा, यश तुमच्या दारात असेल असा मोलाचा संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना दिला.
युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार, मेरा युवा भारत चंद्रपूर आणि सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार पटेल महाविद्यालयात जिल्हास्तरीय 'विकसित भारत युथ पार्लमेंट'चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेच्या माजी महापौर अंजलीताई घोटेकर, चंद्रपूरचे सेवानिवृत्त उपपोलीस अधीक्षक राजेंद्रसिंह गौतम, चंद्रपूर सैनिक शाळेचे 'असिस्टंट मास्टर' मनोदीप ठाकूर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रमोद शंभरकर, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खनके, डॉ. राजकुमार बिरादार, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्याम खंडारे यांनी उद्याचा नेता हा जनसामान्यांचे भूमिका समजावून घेत प्रश्न सोडविणारा बनला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
चांगला वक्ता होण्यासाठी चांगला श्रोता होणे गरजेचे आहे. सातत्यपूर्ण वाचन हे चांगला वक्ता होण्याच्या यशस्वीतेचे गमक आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मंच उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी आपण बोललंच पाहिजे.
असे मार्गदर्शन करताना अंजलीताई घोटेकर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, संचालन पुरुषोत्तम माहोरे, तर आभार प्रदर्शन डॉ. कुलदीप आर. गोड यांनी केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
---------------------
पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड-
'आणीबाणीचे ५० वर्ष : भारतीय लोकशाहीचे धडे' असा या 'युथ पार्लमेंट'चा विषय होता. लोकशाही मूल्यांची जाणीव, जबाबदार नागरिकत्व आणि नेतृत्वगुणांचा विकास घडवणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या स्पर्धेसाठी ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून विक्राम हलदार, साहिल सोनवणे, वेदांत विधाते, हर्षल साळवे, विवेक धुर्वे या पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे पाचही विजयी विद्यार्थी आता मुंबईतील विधानभवनात होणाऱ्या 'राज्यस्तरीय युथ पार्लमेंट' मध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्ह्याचा आवाज आता राज्याच्या सर्वोच्च सभागृहात घुमणार असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.


