गोंडपिपरी नगरात शिक्षणा करिता येणाऱ्या विद्यार्थाच्या अडचणीत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आले धाऊन...!

Chandrapur Media 24

गोंडपिपरी : गोंडपिपरी ला शिक्षणा करीता येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेस मुळे होणाऱ्या त्रास व मागील काही दिवसांपासून सतत बस ची मागणी केली होती, मागणी पूर्ण होत नसल्याने विद्यार्थी नाराज होऊन तालुका दंडाअधिकारी यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला भंगाराम तालोधी जवळील पानोरा मार्गे शिवणी , नंदवर्धन , सुपगाव ह्या गावात रस्त्याची दुर्गती असल्यामुळे त्या गावात बस जाऊ शकत नाहीं त्या मुळे विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील महाविद्यालयात वेळेवर पोहोचु शकत न्हवते, त्याच सोबत अडेगाव ला चेक पिंपरी मार्गे जाणारा मार्ग खराब असल्या मुळे बस जात नसल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणावर व भविष्यातील प्रगतीवर गंभीर परिणाम होत आहे.. 

 अखिल विद्यार्थी परिषद कडून 15 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला असून जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर विद्यार्थी परिषद आंदोलन करेल अशा इशारा गोंडपिपरी नगर मंत्री अनिकेत कलगट्टीवार यांनी दिला ह्या वेळी चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री सुजान चौधरी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख रोहित चौबे, आदर्श मास्टे, किशोर नेवारे, अनिकेत मास्टे, रोहित अर्जुनकर , विष्णू सोयाम शुभम गुरनुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते...