मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
चंद्रपूर:- जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार व त्यांचेसोबत असलेले मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात शहर व गावाखेड्यावरचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश करत असून सध्या मनसे पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे, अशातच जंगल परिसरात असलेले चोरगाव जें लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे विकासापासून दूर आहे त्या गावातील काही युवा कार्यकर्त्यांनी त्या गावाच्या माजी शिवसेना महिला सरपंच सुलोचना कोकाडे यांच्यासह मनसे पक्षात केला प्रवेश.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या कामावर प्रेरित होऊन प्रतीक चिकाटे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या ध्येय धोरणाबाबत उपस्थित गावाकऱ्यांना मार्गदर्शन केले व तुमचा कुठंलाही समस्या कुठलेही प्रश्न असतील ते सोडविण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू कारण जिथे तोंड वाजवून न्याय मिळतं नाही तिथे आम्ही तोंडात वाजवून न्याय मिळवून देतो त्यामुळे आपण निश्चिन्त रहा आम्ही सोबत आहो आणि या चोरगाव ग्रामपंचायत चा सरपंच मनसेचाच राहिलं यासाठी आपण आत्तापासून कामाला लागा असे आवाहन करण्यात आले, या कार्यक्रमात मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचेसह राजू कुकडे जिल्हा उपाध्यक्ष, महेश वासलवार वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष, रमेश काळबांडे जनहित सेना जिल्हाध्यक्ष, सुनील गुढे जिल्हाध्यक्ष, मनोज तांबेकर रोजगार_स्वयम रोजगार जिल्हाध्यक्ष, राजू लांडगे जनहित सेना तालुका सचिव, वर्षा बोंबले शहर अध्यक्ष,राकेश जवादे,अमन तुळ,विशाल भसारकर. उपस्थित होते.

